• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उमरगा : स्वच्छतेच्या घोषणांपासून घाणीच्या साम्राज्याकडे?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
उमरगा : स्वच्छतेच्या घोषणांपासून घाणीच्या साम्राज्याकडे?
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

कचऱ्याचे ढीग, डुकरांचा उपद्रव आणि सांडपाण्यामुळे नागरिक हैराण; प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

उमरगा | प्रतिनिधी

उमरगा शहरातील स्वच्छतेच्या स्थितीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याचे प्रवाह, तुंबलेले नाले आणि डुकरांचा वाढता उपद्रव यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील विविध ठिकाणांची छायाचित्रे समोर आल्यानंतर स्वच्छतेच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RelatedPosts

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

काही दिवसांपूर्वी शहरातील अस्वच्छतेच्या समस्येबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने काही प्रमाणात हालचाली करत स्वच्छता कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. मात्र, सुरुवातीच्या काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाल्याचे दिसून येत आहे.

काळे प्लॉट परिसर, एकोंडी रोड, गणू डॉक्टर प्लॉट, शिवपुरी रोड, शिंदे गल्ली, आरोग्य नगर, वडार गल्ली आदी भागांमध्ये उघड्यावर कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. अनेक नाल्यांमध्ये कचरा साचल्याने पाण्याचा निचरा होत नसून काही ठिकाणी फुटलेल्या पाइपलाइनमधून पाणी रस्त्यावर वाहत आहे. परिणामी दुर्गंधी वाढत असून डास आणि रोगजंतूंची पैदास होण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः कचऱ्याच्या ढिगांवर मोठ्या प्रमाणात डुकरे फिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यासह वाहतुकीलाही धोका निर्माण होत आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

दरम्यान, पावसाळ्याची सुरुवात झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उघड्यावर पडलेला कचरा कुजून दुर्गंधी वाढणे, नाले तुंबणे आणि सांडपाणी रस्त्यावर येणे यामुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि त्वचारोगांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

उमरगा हे तालुक्याचे प्रशासकीय, व्यापारी आणि सामाजिक केंद्र असून दररोज हजारो नागरिक येथे ये-जा करतात. अशा शहराची ओळख अस्वच्छतेमुळे निर्माण होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या मते, तात्पुरत्या स्वच्छता मोहिमांपेक्षा कचरा व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा उभारणे, नियमित साफसफाई, डुकरांच्या उपद्रवावर नियंत्रण, फुटलेल्या पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती आणि नाल्यांची नियमित स्वच्छता यांसारख्या कायमस्वरूपी उपाययोजनांची आवश्यकता आहे.

स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी उमरगा घडविण्यासाठी नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज असून, केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

बसवराज पाटलांना दगा-फटक्याची भीती? सोशल मीडियावरील संदेशाने राजकीय वर्तुळात चर्चा

Next Post

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक) श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी धीरज थोरात यांची निवड

Related Posts

Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
25
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
8
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
3
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
0
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
4
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
2
Next Post
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक) श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी धीरज थोरात यांची निवड

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक) श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी धीरज थोरात यांची निवड

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In