• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावरगाव तांडा वस्तीतील कमी विद्युत दाबाची समस्या अखेर मार्गी; मंदिरावरील वीज वाहिनीचेही स्थलांतर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 10, 2026
in Blog
0
सावरगाव तांडा वस्तीतील कमी विद्युत दाबाची समस्या अखेर मार्गी; मंदिरावरील वीज वाहिनीचेही स्थलांतर
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

पातूर (प्रतिनिधी):
पातूर तालुक्यातील सावरगाव येथील तांडा वस्तीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांना भेडसावत असलेली कमी विद्युत दाबाची (लो व्होल्टेज) समस्या अखेर मार्गी लागली आहे. यासोबतच पाडशिंगी येथील संत सेवालाल महाराज मंदिरावरून जाणारी धोकादायक वीज वाहिनीही गावाबाहेरील शेतातून स्थलांतरित करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या समस्या सुटल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सावरगाव तांडा वस्तीतील नागरिकांना अनेक वर्षांपासून कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांनी ही समस्या सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी महावितरण विभाग तसेच संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला. अखेर या मागणीची दखल घेत महावितरणने तांडा वस्तीसाठी नवीन विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) उपलब्ध करून दिले. त्यामुळे नागरिकांची दीर्घकालीन विजेची समस्या दूर झाली आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

दरम्यान, पाडशिंगी येथील संत सेवालाल महाराज मंदिरावरून जाणारी उच्च दाबाची वीज वाहिनी भाविक व ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत होती. या प्रश्नाकडेही निलेश कापकर यांनी गांभीर्याने लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नांनंतर महावितरण विभागाने संबंधित वीज वाहिनी मंदिर परिसरातून हटवून गावाबाहेरील शेतातून स्थलांतरित केली.

या दोन्ही विकासकामांमुळे सावरगाव आणि पाडशिंगी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर, महावितरण विभाग आणि संबंधित प्रशासनाचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया :
“ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे हीच माझी जबाबदारी आहे. हे यश संपूर्ण गावकऱ्यांच्या एकजुटीचे असून भविष्यातही जनहिताच्या प्रत्येक प्रश्नासाठी मी कटिबद्ध राहणार आहे,” असे सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी सांगितले.

Previous Post

नवेगाव ग्रामपंचायत सांडपाणी व्यवस्थापनात अपयशी; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

Next Post

देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; ११ जागांसाठी रंगणार चुरशीची लढत

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; ११ जागांसाठी रंगणार चुरशीची लढत

देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; ११ जागांसाठी रंगणार चुरशीची लढत

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In