• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निर्गुणा धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला निवेदन; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
निर्गुणा धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला निवेदन; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांची मागणी
0
SHARES
101
VIEWS
Ad 1

पातूर | प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील आलेगाव व परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी चोंढी येथील निर्गुणा धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडण्याची मागणी करत पाटबंधारे विभागाला निवेदन सादर केले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पातूर तालुक्यातील चोंढी येथे असलेल्या निर्गुणा धरण मध्ये सध्या मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र आलेगावसह परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, केवळ नागरिकच नव्हे तर पाळीव जनावरे आणि रानटी प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पशुधन आणि वन्यजीवांचेही हाल होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निर्गुणा धरणातील उपलब्ध पाणी कॅनॉलद्वारे सोडल्यास आलेगाव व परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. तसेच भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी आणि बोअरवेलना पुन्हा पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांसह शेतकरी आणि पशुपालकांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे निलेश कापकर यांनी म्हटले आहे.

या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन पाटबंधारे विभागाने निर्गुणा धरणाचे पाणी कॅनॉलद्वारे सोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

जनतेच्या दारी प्रशासन; पाचोऱ्यात जनसमाधान बैठकीत नागरिकांना थेट संवादाची संधी

Next Post

रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेशतर्फे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेशतर्फे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेशतर्फे पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In