जिल्हा परिषद हायस्कूल माटरगाव बुद्रुक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबवून श्रद्धांजली अर्पण.💐
आज जिल्हा परिषद हायस्कूल माटरगाव बुद्रुक येथे 2 ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान कैलासजी पवार यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय श्री अमोलजी सांगळे साहेब उपस्थित होते. तसेच माटरगावचे ग्रामविकास अधिकारी मा.सावरकर साहेब, संपूर्ण गुरुदेव सेवा मंडळाचे सन्माननीय कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित गावकरी मंडळी हे सर्व उपस्थित होते. याप्रसंगी सांगळे साहेबांनी विद्यार्थ्यांना बापूंच्या जयंतीनिमित्त विशेष असे मार्गदर्शन करून जीवनात मोठे होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित गावकरी मंडळी यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
Discussion about this post