वणी: येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थाद्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी संस्थासचिव मा. ओमप्रकाश चचडा साहेब यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर शाळेचे प्राचार्य श्री. प्रफुल महारतळे, श्री. सतीश बाविस्कर व सौ. अश्लेशा जेनेकर यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.शाळेतील शुभ्रा मत्ते, ओजस्वी तेलतुंबडे, भूमिका किन्हेकर, गुंजन मिलमिले, तिर्थ मथनकार, शैलू मिश्रा,आरोही तुराणकर,जतिन क्यातमवार,श्रावणी शेंदुरकर, योगिनी महाकुलकर इत्यादी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत भाषणे, गीते, सादर केली. उपरोक्त कार्यक्रमाचे औचित्य साधत तालुकास्तरीय रणींग रेस मध्ये प्रथम आलेल्या तन्वी जेंगाठे, आफ्रिन अन्सारी, कामरान शेख व शील खाडे या विद्यार्माथ्यांचा स्मृतीचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाविस्कर सर व जेनेकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना महात्मा गांधी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकीत त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याची गरज अधोरेखित केली .आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे शाळेचे प्राचार्य प्रफुल महारतळे यांनी महात्मा गांधीजींच्या शिकवणींचे चिंतन करून त्या शिकवणी आपण आपल्या दैनंदिन जीवनात कशा प्रकारे लागू करू कराव्या यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओमकार कदम , संचालन कु. आर्या मोहितकर आणि कु. खुशी बोढाले यांनी संयुक्तरित्या तसेच आभार प्रदर्शन आशा प्रजापती यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता सौ. अनुपाली खोब्रागडे मॅडम, अश्विनी शेडमाके , इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .
Discussion about this post