• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माघार जाहीर, पण पाठिंब्यावर मौन; नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांच्या भूमिकेची चर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक विधान परिषद निवडणुकीतील भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, माघारीची घोषणा करताना घडलेल्या एका नाट्यमय प्रसंगामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या शेजारी बसून आयोजित पत्रकार परिषदेत गोकुळ गीते यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले. मात्र, पत्रकारांनी “आपण निवडणुकीतून माघार घेतली आहे, पण नरेंद्र दराडे यांना अधिकृत पाठिंबा देणार आहात का?” असा थेट प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. उलट ते तात्काळ उठून पत्रकार परिषदेतून निघून गेल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना गोकुळ गीते यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, ही जागा भाजपकडून गणेश गीते यांना मिळेल, असा शब्द देण्यात आला होता. मात्र, जागा शिंदे गटाकडे गेल्याने वातावरण बिघडले आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.

ते म्हणाले की, १ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना वारंवार माघार घेण्याबाबत फोन आले. तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला.

गोकुळ गीते यांनी पुढे सांगितले की, गिरीश महाजन यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असून भविष्यात योग्य संधी मिळाल्यास आपला विचार केला जाईल, असा शब्द वरिष्ठांकडून देण्यात आला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी आपण माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, नरेंद्र दराडे यांना स्पष्ट पाठिंबा देण्याबाबत त्यांनी मौन बाळगल्याने महायुतीतील मतभेद पूर्णपणे मिटले आहेत का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. गोकुळ गीते यांच्या या भूमिकेमुळे नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणात आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Previous Post

महाबळेश्वर हेरिटेज गोल्फ कोर्स पर्यावरण नुकसान प्रकरणी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

Next Post

उदगीर-अहमदपूर मार्गावरील सुकणी येथे एसटी बस पलटी; प्रवाशांना ग्रामस्थांची तत्पर मदत

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
50
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
32
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
75
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

उदगीर-अहमदपूर मार्गावरील सुकणी येथे एसटी बस पलटी; प्रवाशांना ग्रामस्थांची तत्पर मदत

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In