• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उदगीर-अहमदपूर मार्गावरील सुकणी येथे एसटी बस पलटी; प्रवाशांना ग्रामस्थांची तत्पर मदत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
0
SHARES
159
VIEWS
Ad 1

उदगीर | प्रतिनिधी :

उदगीर-अहमदपूर मार्गावरील सुकणी गावाजवळ आज दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

RelatedPosts

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

मिळालेल्या माहितीनुसार, उदगीरहून अहमदपूरकडे जाणारी एसटी बस सुकणी गावालगतच्या पुलाजवळून जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पलटी झाली.

अपघाताची माहिती मिळताच सुकणी गावातील युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी त्यांनी बसच्या काचा फोडून बचावकार्य केले. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतुकीत अडचणी निर्माण होत असून अशा प्रकारच्या अपघातांचा धोका वाढला आहे. याच कारणामुळे हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. तसेच पुलाच्या कामादरम्यान योग्य वाहतूक नियोजन आणि सुरक्षेच्या उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचेही नागरिकांनी सांगितले.

या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचे नेमके कारण आणि जखमींची संख्या याबाबत अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

Previous Post

माघार जाहीर, पण पाठिंब्यावर मौन; नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांच्या भूमिकेची चर्चा

Next Post

शिक्षणाचा बाजार की विद्यार्थ्यांचा छळ? आदित्य फार्मसी कॉलेजच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Related Posts

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ
Blog

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026
25
Blog

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
10
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान
Blog

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 12, 2026
16
मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….
Blog

मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर धडक कारवाई,……….

September 12, 2026
51
Blog

अंगणवाडी गुणवत्ता यादीवर आक्षेप; ४ अतिरिक्त गुणांची चौकशी करण्याची मागणी

September 12, 2026
47
Blog

गायनातून कोणत्याही प्रकारचा इन्कम घेतला असाल तर अश्या व्यक्तींना सहभाग घेता येणार नाही.

September 12, 2026
7
Next Post

शिक्षणाचा बाजार की विद्यार्थ्यांचा छळ? आदित्य फार्मसी कॉलेजच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

September 12, 2026

शेतकरी व सर्जा-राजाच्या अतूट बैल पोळा साजरा

September 12, 2026
रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

रिठा तांडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; गुणवंत शिक्षकांचा सन्मान

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In