• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाबळेश्वर हेरिटेज गोल्फ कोर्स पर्यावरण नुकसान प्रकरणी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
0
SHARES
78
VIEWS
Ad 1

महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर येथील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात असलेल्या हेरिटेज ग्रेड-१ दर्जाच्या गोल्फ कोर्स परिसरात कथित पर्यावरणीय हानी आणि नियमबाह्य कामांप्रकरणी संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर नगरपालिकेच्या हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांक ११७ व ११८ मधील गोल्फ कोर्स परिसरात गवत लागवडीसाठी परवानगी घेण्यात आली होती. मात्र, या परवानगीचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात उत्खनन, जमीन सपाटीकरण, पत्र्याचे शेड उभारणे, कुंपण बांधणे तसेच वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, झाडांच्या फांद्या आणि बुंधे जमिनीत गाडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. या कथित प्रकारामुळे पर्यावरणीय नियम तसेच हेरिटेज संरक्षणाच्या निकषांचे उल्लंघन झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार, महाबळेश्वर नगरपालिकेचे वृक्ष अधिकारी कल्याण हिवरे, महसूल विभागाचे तलाठी सागर शिंदे तसेच संबंधित बांधकाम विभाग आणि प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करून कारवाई का केली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

गोल्फ कोर्स परिसरातील कथित नियमबाह्य कामे नगरपालिकेच्या आणि तहसील कार्यालयाच्या जवळच सुरू असताना संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ संबंधित प्रकल्प व्यवस्थापन नव्हे, तर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका प्रशासनावरही ठेवण्यात येत आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सातारा, उपविभागीय अधिकारी कार्यालय, वाई तसेच उच्चस्तरीय पर्यावरण समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांबाबत संबंधित महसूल प्रशासन, महाबळेश्वर नगरपालिका किंवा इतर संबंधित विभागांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीअंती वस्तुस्थिती स्पष्ट होणार असून या प्रकरणाकडे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

आडगाव भोसलेच्या सैनिक परंपरेत भर; दोन युवकांची भारतीय सैन्यात निवड

Next Post

माघार जाहीर, पण पाठिंब्यावर मौन; नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांच्या भूमिकेची चर्चा

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
81
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

माघार जाहीर, पण पाठिंब्यावर मौन; नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांच्या भूमिकेची चर्चा

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In