• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धोम डाव्या कालव्याचे आवर्तन बंद; सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे आज सिंचन भवनावर धरणे आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 14, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

सातारा | प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार धोम डाव्या कालव्याचे सुरू असलेले आवर्तन अचानक बंद करण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध असतानाही केवळ प्रशासकीय आदेशामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

शेतकरी प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची तरतूद राखूनही धोम धरणात शेती सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध आहे. मात्र, कालव्याखालील निम्म्याहून अधिक क्षेत्र अद्याप भिजवणे बाकी असताना आणि आवश्यक पाणीसाठा उपलब्ध असतानाही कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे परिसरातील ऊस, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उभ्या पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊन पिके जळून जाण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

धोम जलाशयातील उपलब्ध पाणी लाभक्षेत्रातील शेतीसाठी तत्काळ उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी लाभधारक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यानुसार सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सातारा येथील सिंचन भवन कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात धोम डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असून शासनाने तातडीने निर्णय घेऊन सिंचनासाठी पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी सर्व लाभधारकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, पाणी प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Previous Post

शंकर बरडे खून प्रकरणात आरोपींना मोठा झटका; पाचही जामीन अर्ज फेटाळले

Next Post

आंबेळे बुद्रुकच्या आदित्य दळवी यांचे एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
14
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
9
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
21
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
23
Next Post
आंबेळे बुद्रुकच्या आदित्य दळवी यांचे एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश

आंबेळे बुद्रुकच्या आदित्य दळवी यांचे एमबीबीएस परीक्षेत घवघवीत यश

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In