• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निर्गुणा नदीवर पूल बांधण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

पातूर प्रतिनिधी : आलेगाव, नाथनगर आणि गोळेगाव या गावांना जोडणाऱ्या निर्गुणा नदीवर तातडीने पूल व जोडरस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रस्ते दुरुस्ती कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत या कामाला प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

पावसाळ्यात संपर्क तुटण्याची समस्या

आलेगाव, नाथनगर व गोळेगाव परिसरातील नागरिकांच्या दळणवळणासाठी निर्गुणा नदीवरील हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र सुरक्षित पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर या गावांचा संपर्क तुटतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. तसेच शेतकरी व शेतमजुरांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या मार्गावर पूल नसल्याने माळी समाजाच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नागरिकांना नदी पात्रातून जावे लागते. अंत्यविधीसारख्या संवेदनशील प्रसंगीही मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे निलेश कापकर यांनी सांगितले.

या पुलाच्या कामाचा प्रस्ताव जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग बाळापूर आणि जिल्हा परिषद अकोला यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला असून सध्या प्रशासकीय मंजुरी व निधीची प्रतीक्षा आहे.

परिसरातील दळणवळण, शिक्षण, आरोग्य आणि शेती विकासासाठी हा पूल अत्यंत आवश्यक असल्याने शासनाने तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

जि. प. शाळा येणेगुर येथे शाळेचा पहिला दिवस उत्साहात; नवोदित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Next Post

निर्गुणा नदीवरील पुलासाठी मंत्री आकाश फुंडकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
1
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post

निर्गुणा नदीवरील पुलासाठी मंत्री आकाश फुंडकर यांची उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In