• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जि. प. शाळा येणेगुर येथे शाळेचा पहिला दिवस उत्साहात; नवोदित विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

उमरगा प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येणेगुर येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवोदित विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्याने परिसर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला होता. सकाळी साडेआठ वाजता शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी व स्वागत रॅली काढण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षिकांनी नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प व पेढे देत स्वागत केले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

स्वागत समारंभात पहिलीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी नवीन पाठ्यपुस्तके व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला. नवीन पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या लक्ष्मी काकू, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माने, स्थानिक लोकप्रतिनिधी सागर पाटील, पालक मुख्तार मुल्ला, दिलीप गायकवाड, इस्माईल मुल्ला, नितीन व्हनाळे तसेच इतर पालक उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक कांबळे गुरुजी व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापकांनी शाळेत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार अंबुसे गुरुजी यांनी मानले. पहिल्याच दिवशी झालेल्या या जंगी स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय ठरला.

Previous Post

जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथे प्रवेश सोहळा उत्साहात

Next Post

निर्गुणा नदीवर पूल बांधण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

निर्गुणा नदीवर पूल बांधण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In