• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठीच – सभापती शिवाजीराव हुडे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

उदगीर | प्रतिनिधी

उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत अडत दुकान हमाल आणि खरेदीदारांच्या मुनिमांमध्ये झालेल्या वादामुळे मागील चार दिवसांपासून बाजार बंद ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी खरेदीदार व व्यापाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावून शेतकरी हिताला प्राधान्य देत कठोर इशारा दिला.

RelatedPosts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

सभापती शिवाजीराव हुडे म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असून शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदार यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. बाजार बंद राहिल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत शेतकऱ्यांचा शेतमाल आता अडत दुकानासमोर येणाऱ्या वाहनातच प्रतवारी करून त्याचा भाव निश्चित करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर माल थेट खरेदीदारांच्या दुकानात किंवा गोडाऊनमध्ये उतरवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माल उतरवण्यासाठी लागणारे कडते, मात्रे आणि हमालीचा अतिरिक्त खर्च वाचणार असून व्यापाऱ्यांचाही वेळ वाचणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या बैठकीस सचिव प्रदीप पाटील, व्यापारी प्रतिनिधी जगदीश बाहेती, रवींद्र कोरे, दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुदर्शन मुंढे, सचिव मुन्ना पेन्सलवार, कोषाध्यक्ष माऊली पंदिलवार, कल्पेश बाहेती, लक्ष्मीकांत चिकटवार, राजेश अंबरखाने, दत्ता बिरादार, मोहन हैबतपुरे, शिवलिंग हैबतपुरे, विष्णू अरदवाड, साईनाथ कोरे, नरसिंग चिमणचोडे, लक्ष्मीकांत रायवाड, राहुल मलगे, सूरज नावंदर यांच्यासह अनेक व्यापारी व खरेदीदार उपस्थित होते.

सभापती हुडे यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पाणी आता डोक्याच्या वर गेले आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान सहन केले जाणार नाही. आवश्यक असल्यास बाजार समिती कठोर निर्णय घेईल.”

Previous Post

तामकणे गावात बिबट्याची दहशत; पाळीव कुत्र्यावर हल्ला करून बिबट्या पसार

Next Post

लिटिल फ्लॉवर्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

Related Posts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार
Blog

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
5
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;
Blog

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026
8
Blog

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

August 14, 2026
2
जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Blog

जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

August 14, 2026
101
‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण
Blog

‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण

August 14, 2026
15
खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !
Blog

खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !

August 14, 2026
6
Next Post

लिटिल फ्लॉवर्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

August 14, 2026
सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In