श्रीगोंदा : तालुकाप्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्याचा विकास आणि नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकनेते खासदार निलेश लंके थेट जनतेच्या भेटीला येत आहेत. प्रशासकीय कामांचा गतिमान आढावा आणि जनतेच्या समस्यांचे निवारण एकच छताखाली दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी पंचायत समिती ,श्रीगोंदा होणार आहे.
या आढावा बैठकीत व जनता दरबारात पंचायत समिती,महसूल,वीज वितरण,पोलिस प्रशासन आणि इतर सर्व प्रमुख शासकीय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे तालुक्याच्या विकासकामांचा
आढावा घेतला जाईल आणि शेतकऱ्यांच्या समस्या,घरकुल,रस्ते,पाणी,वीज,विविध शासकीय योजनांमधील प्रलंबित कामे, प्रशासकीय स्थरावर होणारी दिरंगाई या विषयावर तसेच जनतेच्या तक्रारींवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
” श्रीगोंदा तालुक्यातील विकासकांचा आढावा घेणे आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय देणे हाच या आढावा बैठकीचा आणि जनता दरबाराचा मुख्य हेतू आहे .तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या लेखी तक्रारी आणि अर्जासह उपस्थित रहावे असे आवाहन खासदार लंके यांनी केले आहे.










