• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

संविधान उद्देशिकेची 4 जिल्हा परिषद शाळांमध्ये भेट
कापडगाव येथे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ; कुसूर, डोंबाळवाडी व काळज येथेही उपक्रम
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २३१ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय मानवअधिकार महिला व बाल संरक्षण परिषदेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण व संविधान जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात कापडगाव येथे करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत कापडगावसह कुसूर, डोंबाळवाडी आणि काळज येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येकी 30 झाडे, अशी एकूण १२० झाडे भेट देऊन विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्ष लागवड करण्यात आली. केवळ वृक्षलागवड न करता लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारीही घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

RelatedPosts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

याचबरोबर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रती भेट देण्यात आल्या. व त्या शाळेतील मुलांनी स्वतः म्हणून प्रत्येकाने दाखवली हे बघून आम्हाला अभिमान वाटला पर्यावरण संवर्धनासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संविधान, लोकशाही, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यातून लोककल्याण, समाजसेवा आणि जनहिताचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्या विचारांना कृतीची जोड देण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आला.

यावेळी राष्ट्रीय मानवअधिकार महिला व बाल संरक्षण परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रेम मोरे, लेखक व सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ, पुणे जिल्हा उपाध्यक्ष नानासो गोवेकर, साहित्यिक मार्गदर्शक तानाजी जगताप, मार्गदर्शक अरविंद सुळ, कापडगावचे माजी उपसरपंच राम केसकर, युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते सागर सुळ, युवा उद्योजक वैभवराज नरुटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादासो सुळ, गोरख सुळ, युवा उद्योजक यश पिसाळ, पिसाळ साहेब, सतीश गाढवे साहेब यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
“एक झाड – एक कुटुंब आणि संविधानाची उद्देशिका – प्रत्येकाच्या हातात” या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धन आणि संविधानिक मूल्यांची जनजागृती या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम या अभियानातून साधण्यात आला.

Previous Post

कृषी बंधारे दुरुस्त करणे व तलावातील अनधिकृत मोटारी बंद करण्याची मागणी

Next Post

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

Related Posts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
0
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
1
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
23
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
15
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
4
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
Next Post
सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In