• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

दापोली : केळशी गावासाठी मंजूर झालेली जलजीवन मिशन ‘हर घर जल’ पाणीपुरवठा योजना निधीअभावी गेल्या दीड वर्षांपासून अर्धवट अवस्थेत रखडल्याने ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. योजना तातडीने पूर्ण करून गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, या मागणीसाठी १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दापोली तहसीलदार कार्यालयासमोर केळशी ग्रामस्थ एकदिवसीय उपोषण करणार आहेत.

RelatedPosts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन ‘हर घर जल’ अंतर्गत केळशी गावासाठी नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असले, तरी जवळपास दीड वर्षांपासून निधीअभावी योजना अर्धवट अवस्थेत पडून असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याबाबत शासन तसेच स्थानिक पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्याने योजना पूर्ण होण्यास विलंब होत आहे. योजना अपूर्ण राहिल्याचा थेट परिणाम यावर्षी केळशीतील नागरिकांना भोगावा लागला असून, एप्रिल ते जून या तीन महिन्यांत गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. अखेर नागरिकांना टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा आणि केंद्र सरकारच्या ‘हर घर जल’ या उद्दिष्टाची केळशी गावात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी अखेर उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

केळशीचे माजी उपसरपंच केदार विलास पतंगे यांच्यासह ग्रामस्थांनी याबाबत दापोली तहसीलदार कार्यालय तसेच संबंधित विभागाकडे लेखी पत्र सादर केले आहे. उपोषणाबाबतचे पत्र पंचायत समिती दापोलीच्या ग्रामपंचायत विभागालाही प्राप्त झाले असून, तक्रारीवर सविस्तर चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रशासनाच्या पत्रातून स्पष्ट होते.

पंचायत समितीने संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक माहितीसह बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ग्रामपंचायत केळशीच्या अधिकाऱ्यांना तक्रारीशी संबंधित कागदपत्रे व आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती घेऊन उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत तहसीलदार कार्यालयासमोर होणाऱ्या एकदिवसीय उपोषणाकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. रखडलेली जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासन ठोस निर्णय घेणार का, तसेच केळशीकरांचा पाणीप्रश्न कधी मार्गी लागणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

Previous Post

खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !

Next Post

जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Posts

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
1
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
6
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
23
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
17
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
4
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
Next Post
जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In