• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोंडाईचा परिसरातील बस सेवा बंद; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात – तत्काळ बस सुरू करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

दोंडाईचा | प्रतिनिधी
दोंडाईचा शहर व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे संतप्त विद्यार्थी व पालकांनी बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.

दोंडाईचा शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी दररोज एसटी बस सेवांवर अवलंबून असतात. मात्र, गेल्या वर्षभरात अनेक मार्गांवरील बस सेवा बंद करण्यात आल्याने तसेच काही बसेस शाळा व महाविद्यालयांच्या वेळांशी विसंगत वेळेत धावत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

RelatedPosts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

विशेषतः सोनशेलू, मेथी, वरझडी, देगाव, लोहगाव, कोळदे, कर्ले, रामी आणि खोकराळे या गावांतील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचणे शक्य होत नसून काहींना तर प्रवासाची सुविधा नसल्याने शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येत असल्याची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या दोंडाईचा आगार व्यवस्थापनाकडे निवेदन सादर करून सर्व मार्गांवरील बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेनुसार बसचे वेळापत्रक निश्चित करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नावर त्वरित निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, बांधकाम सभापती मुकेश देवरे, नगरसेवक कृष्णा नगराळे, जितेंद्र डी. गिरासे, संजोग रामोळे, संजय तावडे आदी पदाधिकाऱ्यांनी दोंडाईचा आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांना निवेदन दिले. तसेच निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, धुळे विभाग नियंत्रक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

Previous Post

कन्हेरवाडी येथील फड कुटुंबियांचे अनेकांकडून सांत्वन

Next Post

वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

Related Posts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
0
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा
Blog

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026
4
Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
51
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
Next Post

वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न

ताज्या बातम्या

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In