• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उत्तर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण; जळगाव जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

रावेर प्रतिनिधी, २ जुलै : राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील पाच दिवस जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सध्या राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला असून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातही ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

जळगाव जिल्ह्याचा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज

  • २ जुलै (बुधवार) : दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
  • ३ जुलै : अंशतः ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी
  • ४, ५ आणि ६ जुलै : जिल्ह्यात विविध भागांत हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह एक-दोन सरी पडण्याची शक्यता

या काळात हवामानात काही प्रमाणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील इतर भागांतही पावसाचा जोर कायम राहणार असून कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे तसेच मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जळगाव जिल्ह्यात पावसाची तूट कायम

यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावत जिल्हावासीयांची प्रतीक्षा वाढवली होती. मात्र, ३० जूनअखेरपर्यंत काहीसा दिलासादायक चित्र समोर आले आहे. जून महिन्यात अधिकृत नोंदीनुसार अवघ्या सात दिवस पावसाची नोंद झाली असली तरी या सात दिवसांतच जूनच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तब्बल ६८ टक्के पाऊस झाला आहे.

तथापि, जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पावसाची तूट कायम असल्याची नोंद करण्यात आली आहे.

पालघर आणि रायगडमध्ये शाळांना सुट्टी

कोकणातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनाही आज सुट्टी देण्यात आली आहे.

Tags: Manoj Sarvane
Previous Post

चांदापुरी गावच्या सुपुत्राची देशसेवेसाठी झेप

Next Post

भुसावळमध्ये पाणीटंचाई तीव्र; टँकरवरून नागरिकांमध्ये वाद

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
13
Next Post

भुसावळमध्ये पाणीटंचाई तीव्र; टँकरवरून नागरिकांमध्ये वाद

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In