• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निंभोरा सिम ते विटवा मार्गावरील भुई नदी पूल धोकादायक; पूल व रस्ता वाहतुकीसाठी बंद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

रावेर प्रतिनिधी

निंभोरा सिम ते विटवा जाणाऱ्या मुख्य मार्गावरील भुई नदीवरील पूल अतिशय खराब अवस्थेत असून पुलावर मोठा खड्डा पडल्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पूल आणि रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

RelatedPosts

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतीश मोरे यांचा गौरव

मात्र, पूल बंद झाल्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी आणि मजूर वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत असून हा मार्ग तब्बल १० ते १२ किलोमीटर लांब असल्याने वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.

विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना कामावरून ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच शेतकऱ्यांनाही शेतीकामासाठी शेतात जाणे कठीण झाले असून शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे.

पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे “पूल दुरुस्तीचे काम नेमके कधी सुरू होणार?” आणि “वाहतूक पुन्हा कधी सुरळीत होणार?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पूल दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून लवकरात लवकर पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

Tags: Manoj Sarvane
Previous Post

अकलूजच्या पाणीटंचाई प्रश्नासाठी किरण साठे यांची पुढाकाराने धाव; नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा

Next Post

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

Related Posts

ताज्या घडामोडी

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

July 6, 2026
0
ताज्या घडामोडी

मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतूक विस्कळीत

July 6, 2026
1
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतीश मोरे यांचा गौरव

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

पंढरपुरात पोलीस पाटील संघटनेची सुनेत्रा अजित पवार यांची भेट; प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा

July 6, 2026
15
ताज्या घडामोडी

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

July 6, 2026
10
ताज्या घडामोडी

अकलूजच्या पाणीटंचाई प्रश्नासाठी किरण साठे यांची पुढाकाराने धाव; नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा

July 6, 2026
5
Next Post

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

ताज्या बातम्या

फलटण येथे ‘जनहित सर्वसमाज वधू-वर सूचक केंद्र’च्या माध्यमातून समाजसेवेचा उपक्रम

July 6, 2026

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

July 6, 2026

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; सोमवार, ६ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In