• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावरगावच्या सरपंच राधा पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

कागदपत्रे न दिल्याने भोवले; सीईओंकडून बडतर्फीसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव

प्रतिनिधी | गेवराई :

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

गेवराई तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच राधा विष्णू पिसाळ यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. कर्तव्यात कसूर करणे, शासकीय नियमांचे उल्लंघन करणे तसेच चौकशी समितीला सहकार्य न करता ग्रामपंचायतीचे अभिलेख उपलब्ध करून न दिल्याचा गंभीर ठपका ठेवत बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 39 (1) अन्वये पदच्युती (बडतर्फी) कारवाईसाठी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील रहिवासी संतोष नारायण जाधवर आणि रणजित लक्ष्मण नागरे यांनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी सरपंच राधा पिसाळ यांच्या कामकाजाविरोधात विभागीय आयुक्तांकडे गंभीर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेने गेवराईचे गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. गटविकास अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेली चौकशी समिती सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयात तपासणीसाठी पोहोचली. मात्र, सरपंच राधा पिसाळ तसेच संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाकडून चौकशी समितीला आवश्यक शासकीय अभिलेख आणि कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यानंतर प्राप्त चौकशी अहवालाच्या आधारे 18 जून 2026 रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात विशेष सुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सुनावणीदरम्यानही सरपंचांकडून कोणतेही अभिलेख अथवा त्यांच्या बाजूचे पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी सरपंच राधा पिसाळ यांच्याविरोधात पदच्युतीची कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली असून, आता पुढील निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Tags: Datta Giri
Previous Post

निंभोरा सिम ते विटवा मार्गावरील भुई नदी पूल धोकादायक; पूल व रस्ता वाहतुकीसाठी बंद

Next Post

शाहूवाडीचे सुपुत्र डॉ. दिलीप पाटील यांना अमेरिकेत मानाचा ‘चेअरमन अवॉर्ड’

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post

शाहूवाडीचे सुपुत्र डॉ. दिलीप पाटील यांना अमेरिकेत मानाचा ‘चेअरमन अवॉर्ड’

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In