• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पूरग्रस्त ठाकूरपाडा-दुष्मी खारपाडा गावाला पत्रकार कैलासराजे घरत व ग्रामपंचायत सदस्यांची भेट; नागरिकांना दिलासा, मदतीचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

पेण प्रतिनिधी :

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील ठाकूरपाडा, दुष्मी आणि खारपाडा परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाताळगंगा नदीने धोकादायक पातळी गाठल्याने परिसर जलमय झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पत्रकार कैलासराजे घरत आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हिरामण घरत यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली.

पाहणीदरम्यान ठाकूरपाडा गावातील श्री. मनोहर शंकर ठाकूर आणि गिरीश वामनराव घरत यांच्या घरात तब्बल २ ते ३ फूट पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. तसेच ठाकूरपाडा तळे परिसरातील वासुदेव रामा ठाकूर यांच्या घरातील स्वयंपाकघरातही सुमारे ३ फूट पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी पत्रकार कैलासराजे घरत यांनी पूरग्रस्त नागरिकांना धीर देत, “आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही मदत लागल्यास तात्काळ संपर्क साधा. आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत,” असे आश्वासन दिले.

या दौऱ्यादरम्यान आत्माराम ठाकूर, गोपीनाथ ठाकूर, सागर लक्ष्मण ठाकूर, हिरामण मोरे, नरेंद्र मोरे, विश्वास ठाकूर, माजी सदस्य श्रीमती सुजाता ठाकूर तसेच दुष्मी येथील मधुकर पांडुरंग ठाकूर, कृष्णा घरत, वसंत पांडुरंग ठाकूर आणि खारपाडा गावातील बाळकृष्ण गणपत घरत, शाम गणपत घरत, सुहास बाळकृष्ण घरत, सुबोध अनंता घरत आदी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

बातमीचे मुख्य मुद्दे :

  • ठिकाण: ठाकूरपाडा, दुष्मी व खारपाडा, ता. पेण
  • पाहणी: पत्रकार कैलासराजे घरत व ग्रामपंचायत सदस्य हिरामण घरत यांनी पूरग्रस्त भागाची भेट घेतली
  • नुकसान: अनेक घरांमध्ये २ ते ३ फूट पाणी शिरले
  • मागणी: प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी
  • दिलासा: नागरिकांना मदतीचे आश्वासन

Previous Post

प्रशासनाची वाट न पाहता समाजसेवकांनीच कुदळी-फावडे घेऊन खारपाडा-समर्थनगर रोडवरील पाण्याचा प्रश्न सोडवला

Next Post

देवळी येथे बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना कपडे, किराणा किट व भेटवस्तूंचे वाटप

Related Posts

Blog

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026
6
Blog

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026
5
Blog

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात; ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

August 20, 2026
1
Blog

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

August 20, 2026
15
Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
15
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
8
Next Post

देवळी येथे बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना कपडे, किराणा किट व भेटवस्तूंचे वाटप

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In