• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अतिवृष्टीच्या संकटात रत्नागिरी पोलीस प्रशासन अलर्ट; पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः घटनास्थळी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

दापोली | प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी स्वतः कशेडी घाट, खेड, चिपळूण तसेच इतर संवेदनशील आणि पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

कशेडी घाटात वाहतूक सुरळीत राहावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. धोकादायक ठिकाणी सतर्कतेचे फलक उभारण्यात आले असून, वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

खेड शहरात जगबुडी नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या परिसराची पाहणी करत त्यांनी नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यानंतर चिपळूण पोलीस ठाण्यात भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या आपत्कालीन साहित्याची पाहणी करण्यात आली. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन पूरस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी बचाव व मदतकार्य वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

संकटाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणाऱ्या रत्नागिरी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Previous Post

सोयगाव तालुक्यातील ८४ गावांतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप; सामाजिक उपक्रमाला नागरिकांचे सहकार्याचे आवाहन

Next Post

यवतमाळ–वाशीम लोकसभा अध्यक्षपदी सुनील पाटील चिंचोलकर यांची नियुक्ती

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
9
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
12
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
207
Next Post

यवतमाळ–वाशीम लोकसभा अध्यक्षपदी सुनील पाटील चिंचोलकर यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In