• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एसआयआर मोहिमेत बीडमधील मुस्लिम नगरसेवक व कार्यकर्त्यांचा पुढाकार; नागरिकांना बीएलओंना सहकार्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेला वेग आला असून, घरभेटीद्वारे मतदारांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. या मोहिमेत बीड शहरातील मुस्लिम नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

स्थानिक पातळीवर अनेक नगरसेवक व कार्यकर्ते आपल्या प्रभागातील नागरिकांना फोन करून बीएलओ भेटीची माहिती देत आहेत. तसेच गणना प्रपत्र कसे भरायचे, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबत मार्गदर्शनही करत आहेत. त्यामुळे अनेक नागरिक स्वतःहून बीएलओंना आवश्यक माहिती उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रयत्नांमुळे संबंधित भागांमध्ये एसआयआरचे सुमारे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असून, इतर भागांमध्येही अशीच जनजागृती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गणना प्रपत्र भरण्याचे वेळापत्रक

प्रशासनाच्या माहितीनुसार, ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ घरभेटीद्वारे गणना प्रपत्र भरून घेत आहेत. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान दावे व हरकती स्वीकारल्या जातील. सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

बीएलओ तुमच्या दारी

प्रशासनाने मतदारांना अर्जातील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची माहिती, आधार तपशील, छायाचित्र आणि इतर आवश्यक माहिती अचूकपणे देण्याचे आवाहन केले आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यात २,४१६ बीएलओ, २४४ बीएलओ पर्यवेक्षक आणि २,६१६ बीएलओ सहाय्यक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच काही भागांत स्थानिक लोकप्रतिनिधींनी बीएलओंची नावे व संपर्क क्रमांक नागरिकांच्या व्हॉट्सअॅप गटांवर उपलब्ध करून दिले असून, कोणतीही अडचण असल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतदारांनी वेळेत माहिती देऊन मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

यवतमाळ–वाशीम लोकसभा अध्यक्षपदी सुनील पाटील चिंचोलकर यांची नियुक्ती

Next Post

रावेतमध्ये ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित; ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
5
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
8
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
217
Next Post

रावेतमध्ये ४८ तासांपासून वीजपुरवठा खंडित; ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचे हाल

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In