• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

कळंबोली | प्रतिनिधी

कळंबोली येथील सेक्टर-८ ई, प्लॉट क्रमांक ११ परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मंगळवारी मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. लक्ष्मी डेव्हलपर्स व वेल्किन बिल्डर्स यांच्या वेल्किन हायट्स प्रकल्पासाठी उभारण्यात आलेली सुमारे २० फूट उंच संरक्षक लोखंडी पत्र्यांची भिंत अचानक कोसळून शेजारील हेरंब सोसायटीच्या आवारात पडली. या घटनेत अनेक दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

घटनेत सोसायटीची संरक्षक भिंतही कोसळली असून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे माती खचल्याने आणि संरक्षक भिंतीसाठी आवश्यक मजबूत पाया न घातल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. लोखंडी अँगल थेट मातीमध्ये बसविल्याने संपूर्ण संरचना कोसळल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेविका विद्या गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी संबंधित बिल्डरवर कठोर कारवाई करण्याची तसेच नुकसानग्रस्त वाहनधारकांना तातडीने योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

दरम्यान, पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून परिसर सुरक्षित केला असून दुर्घटनेची चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर निवासी भागालगत सुरू असलेल्या बांधकामांमध्ये सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि निष्काळजीपणा करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

सलावत प्लॉटमध्ये घाणीचे साम्राज्य; २० जुलैपर्यंत स्वच्छता न झाल्यास जनआक्रोश मोर्चाचा इशारा

Next Post

SJFOI महाराष्ट्र अध्यक्षपदी ओमप्रकाश शिंदे, सरचिटणीसपदी संजय जोशी यांची नियुक्ती

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
19
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
91
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post

SJFOI महाराष्ट्र अध्यक्षपदी ओमप्रकाश शिंदे, सरचिटणीसपदी संजय जोशी यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In