• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भातकुली तालुक्यात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान कृती समितीची बैठक संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

अमरावती | प्रतिनिधी

भातकुली तालुक्यात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय कृती दल समितीची बैठक पंचायत समिती भातकुली येथील समग्र शिक्षा अभियान सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बैठकीच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी तृप्ती दुरुगकर होत्या. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी तथा समितीच्या सचिव डॉ. श्वेता सालफळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी नारायण टेरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण खराटे, डॉ. महेंद्र मेश्राम, डॉ. निखिल उपलवार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सोनाली देशमुख, विस्तार अधिकारी (पंचायत) निलेश भुयार, आरोग्य सहाय्यक निशांत सरप, वाघमारे तसेच ग्रामविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्वेता सालफळे यांनी अभियानाची उद्दिष्टे, महिनानिहाय राबविण्यात येणारे आरोग्यविषयक उपक्रम तसेच भातकुली तालुक्यातील ग्रामपंचायतींना बेसलाईन असेसमेंटमध्ये मिळालेल्या गुणांची माहिती दिली.

यानंतर डॉ. प्रवीण खराटे व डॉ. सोनाली देशमुख यांनी ग्रामस्तरावर नियोजन, विविध विभागांमधील समन्वय आणि अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय पुरस्कारांची माहिती देत, ७० किंवा त्यापेक्षा अधिक बेसलाईन स्कोअर असलेल्या ग्रामपंचायती स्पर्धेस पात्र असल्याचे सांगितले.

गटविकास अधिकारी तृप्ती दुरुगकर यांनी अभियानाचा आढावा घेत सर्व ग्रामपंचायतींनी समन्वयाने कार्य करून कृती आराखडा तयार करावा आणि आरोग्यविषयक निकषांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. सहाय्यक गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांनीही ग्रामपंचायतींनी आरोग्य अभियानाला प्राधान्य देत उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.

बैठकीत सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून भातकुली तालुक्यातील प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दर महिन्याला कृती समितीची बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Tags: Avinash Gondane
Previous Post

सेवापूर्ती निमित्त सहाय्यक शिक्षक देवानंद पाटील यांचा सपत्नीक सत्कार

Next Post

अण्णा हजारे यांच्या हस्ते ‘शिवपाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रा’चा शुभारंभ; नाथाभाऊ शिंदे पाटील यांचा ‘संघर्ष योद्धा’ म्हणून गौरव

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
5
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
95
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
37
Next Post

अण्णा हजारे यांच्या हस्ते ‘शिवपाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रा’चा शुभारंभ; नाथाभाऊ शिंदे पाटील यांचा ‘संघर्ष योद्धा’ म्हणून गौरव

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In