
मां दुर्गा हे मांगल्य, चैतन्य, ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे. अनेक कटिंग प्रसंगी देवीचे आराधना केली जाते, कारण मा दुर्गेचे दुसरे रूप म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड म्हणावे लागेल. घटस्थापने पासून ते दसऱ्यापर्यंत, संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने उत्साहाचे आणि मांगल्याचे वातावरण अनुभवायला मिळते.
मा दुर्गा ची शक्ती अमर्यादित आणि अनंत आहे, ज्याची ज्यांना करणे अशक्य आहे. म्हणूनच शुभकार्यापासून ते कठीण प्रसंगापर्यंत देवीच्या आराधना महत्त्वाची मानली जाते .
देवीच्या विविध रूपाची पूजा मानव जातीच्या कल्याणासाठी प्रेरणादायी ठरते. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देवीची नऊ रूप आपण पाहतो. या उत्सवात पृथ्वीवर देवीची उपस्थिती अनुभव येतो
देवी भागवत पुराणानुसार देवीची१०८ शक्तिपीठ आहेत.शिवाय, कालिका पुराणात २६, शिवचरित्र पुराणात ५१,तर दुर्गा सप्तशती आणि तंत्रचूडामणीमध्ये शक्तीपीठांची संख्या ५२असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्राच्या अहोभाग्याने,५२शक्तीपीठांपैकी साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहे….
: भारतातील प्रमुख साडेतीन शक्तीपीठ म्हणजे:
१.श्री महालक्ष्मी (कोल्हापूर): ये देवीचे जागरूक शक्तीपीठ आहे, ज्याची प्रतिष्ठा संपूर्ण देशभरात आहे.
२.श्री रेणुका माता (माहूर): दुसरे जागृत शक्ती पीठ माहूर गडावर स्थित, हे रेणुका मातेचे आहे तेथे परशुराम आणि दत्तात्रय चे मंदिर आहे.
३.श्री तुळजाभवानी (तुळजापूर): छत्रपती शिवाजी महाराजांच्या आराध्य देवी म्हणून प्रसिद्ध, तो तुझा भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे.
४. सप्तशृंगी देवी (नाशिक): सप्तशृंगी देवीला महाकाली महालक्ष्मी आणि महा सरस्वती संयुक्त रूपात पूजलं जातं.
नवरात्र उत्सवाच्या काळात संपूर्ण देशात नवचैतन्य वातावरण निर्माण होतं.आबालवूध्द सर्वजण देवीच्या आराधनेत तल्लीन होतात.या उस्तावात आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दसऱ्याच्या विजयादशमी सन, जात असूरी शक्तीचा नाश आणि सत्याचा विजय साजरा केला जातो. प्रभू रामचंद्राने रावणाचा पराभव केला, ज्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
या काळातील निसर्गाचं वातावरणही बदलत. नवरात्रीतून दिवाळी सणाची चाव लागते आणि संपूर्ण सृष्टी नवचैतन्य फुलून जाते. महाराष्ट्र, संताची भूमी, देवी देवताच्या मंदिरांनी समृद्ध आहे. प्रत्येक नागरिकांनी किमान एकदा तरी या शक्तीपीठाचे दर्शन घ्यायला हवं. परंतु नवरात्र उत्सव साजरा करताना, आपण निसर्गाच्या रक्षणासाठी देवीला प्रार्थना करणे ही महत्त्वाच्या आहे. दिवसेंदिवस वाढणारा प्रदूषण आणि जंगलतोड त्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडला आहे. याचा परिणाम पशु पक्षी आणि जीवजंतूंवर होत आहे, अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने, संपूर्ण भक्तांनी वृक्ष लागवडीकडे लक्ष दिले पाहिजे. फक्त फोटोसेशनपुरते नाही, तर युद्ध पातळीवर वृक्ष लागवड मोही राबवली पाहिजे. यात सरकार प्रशासन, सामाजिक संस्था आणि दुर्गा मंडळाच्या सहभाग आवश्यक आहे. वृक्ष लागवडीमुळे स्थल ,जल आणि वायू यांचे संतुलन राखण्यास मदत होईल,
आणि देवी महालक्ष्मी रेणुका माता, तुळजाभवानी आणि सप्तशृंगी देवीच्या आशीर्वादाने देशात सुख शांती आणि समृद्धी नांदेल…
देवीच्या चरणी प्रार्थना आहे की, नवरात्र उत्सवाचा पावन पर्वत वृक्ष लागवड होऊन संपूर्ण भारतात पर्यावरण संरक्षण च्या इतिहास निर्माण व्हावा. कारण पृथ्वीची पूजा केली तर देवीची दर्शन फुलं, पान आणि फळांमध्ये आपापल्या निश्चित च होईल..
!!! सर्व म मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!!!
Discussion about this post