• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाच दिवस अंधारात सहा गावे; संतप्त ग्रामस्थांचा दापोली महावितरण कार्यालयावर मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

दापोली | प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील गावरई, तेरेवायंगणी, उंबर्ले, ओळगाव, नानटे आणि किनल या सहा गावांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित असल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी (८ जुलै) रात्री दापोली येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला. रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर महावितरणने उद्यापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

सलग पाच दिवस वीज नसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम झाला आहे. शेतीची कामे ठप्प झाली असून लघुउद्योजक आणि व्यावसायिकांनाही आर्थिक फटका बसत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील काही दिवसांपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत अखेर सहाही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयात दाखल झाले.

रात्री सुमारे ९ ते १०.३० या कालावधीत ग्रामस्थ आणि महावितरण अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दापोली पोलीस घटनास्थळी तैनात होते.

चर्चेनंतर महावितरण प्रशासनाने तातडीने तांत्रिक पथके कामाला लागल्याची माहिती देत उद्यापर्यंत सहाही गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले.

मात्र, दिलेल्या मुदतीत वीजपुरवठा सुरू झाला नाही, तर सहाही गावांतील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

या घटनेमुळे दापोली तालुक्यातील वीजपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, महावितरण प्रशासन आपल्या आश्वासनाची पूर्तता करते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील छताचा भाग कोसळल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण

Next Post

राष्ट्रीय महामार्गावरील दरोडेखोर टोळीला १२ तासांत बेड्या; बोरगाव पोलिसांची धडक कारवाई

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
4
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
2
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
3
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
4
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
9
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
3
Next Post

राष्ट्रीय महामार्गावरील दरोडेखोर टोळीला १२ तासांत बेड्या; बोरगाव पोलिसांची धडक कारवाई

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In