ग्रामसेवक /सरपंच यांना गावातील कामकाजाची माहिती विचारली असताना निदर्शनास आले कि काम फक्त कागदावरच झालेला आहे विस्तार अधिकारी यांनी न चौकशी करता एबी भरुन बिल काढण्यात आले.गावातील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांना तक्रारी अर्ज केला.त्यानतर चौकशी समिती नेमण्यात आली चौकशी समितीचे पी.सी.पाडवी. साहेब व सरपंच ग्रामसेवक काही गावांतील नागरिक यांच्या सोबत कामकाजाची पाहाणी करण्यात आली
त्यावेळी पाडवी साहेब यांनी पत्रकारांशी संवाद साधुन सांगितले का काम झाले नाही आहे परंतु बिल काढण्यात आले आहे. सरपंच घनशाम महाले व ग्रामसेवक यांनी चुकीचं पध्दतीने पदांचा गैर वापर केला आहे.आम्ही पुढील तपास करून कारवाई करू असे सांगितले.
परंतु नागरिका मध्ये नारजागीचे चिन्ह दिसत आहे अधिकारी यांना सर्व मोकळे दिसून आले आहे तरी झोपले आहेत का .कदाचित वरिष्ठ अधिकारी व सरपंच ग्रामसेवक यांच्या मध्ये काही साटेलोटे आहे का अशी नागरिकांची शंका आहे.
सुधाकर महाले अनिल ठाकरे दिलीप ठाकरे सत्यभामा भडांगे सुनिता महाले विमल महाले प्रल्हाद महाले निलेश गायकवाड लिला पालवी सविता धुळे दत्तु बोरसे मनोहर बेडकोळी आदि ग्रामस्थांनी निर्भय महाराष्ट्र पार्टी कडे न्याय मागण्यासाठी अर्ज दाखल केला आहे .
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राज्य सचिव नितीन रेवघडे यांनी जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांच्या कडे तपास सोपवला आहे. जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित हे खरी परिस्थिती जाणून दोषींवर कठोर कारवाई करण्याची अधिकाऱ्यांना मागणी करणार असल्याचे सांगितले.
Discussion about this post