• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उर्दू माध्यमातील विद्यार्थिनींसाठी शिरपूर–पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची विधान परिषदेत मागणी; आ. भावना गवळींचा पाठपुरावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

पातूर | प्रतिनिधी : प्रमोद डोंगरे

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, मेडशी, शिरपूर आदी भागांतील उर्दू माध्यमाच्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शाहबाबू विद्यालयात दररोज ये-जा करावी लागते. मात्र, जिल्ह्याच्या सीमेमुळे मानव विकास मिशनअंतर्गत चालणाऱ्या बससेवेचा लाभ या विद्यार्थिनींना मिळत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिरपूर ते पातूर मानव विकास बससेवा सुरू करण्याची मागणी विधान परिषदेत करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील सुमारे 110 विद्यार्थिनी आणि 73 विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दररोज पातूर येथे प्रवास करतात. संबंधित परिसरात उर्दू माध्यमातून सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पातूर येथे जावे लागते.

हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शाहबाबू संस्था, पातूरचे सचिव सैय्यद इस्हाक राही यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अकोला व वाशिम जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक, आगार प्रमुख तसेच संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी आमदार भावना गवळी यांची भेट घेऊन हा विषय मांडला.

आमदार भावना गवळी यांनी यापूर्वीही या प्रश्नाचा पाठपुरावा केला असून, बुधवार (दि. ८ जुलै) रोजी त्यांनी विधान परिषदेत हा विषय उपस्थित करत शिरपूर–पातूर मानव विकास बससेवा तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी केली.

यावर परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.

या प्रश्नाला विधान परिषदेत वाचा फुटल्यानंतर उर्दू माध्यमातील विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच बससेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया : सैय्यद इस्हाक राही (सचिव, शाहबाबू संस्था, पातूर)

“आमदार श्रीमती भावना गवळी यांनी विद्यार्थिनींसाठी सुरक्षित बससेवा सुरू करण्याची मागणी विधान परिषदेत मांडली, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेबद्दल मनःपूर्वक आभार. ही मागणी लवकर मंजूर होऊन बससेवा सुरू झाल्यास अल्पसंख्याक समाजातील हजारो विद्यार्थिनींना सुरक्षित, सुलभ आणि नियमित शिक्षणासाठी मोठा आधार मिळेल.”

पालकांची भावना

“आमदार भावना गवळी यांनी आमच्या मुलींच्या शिक्षणाचा आणि सुरक्षित प्रवासाचा प्रश्न विधान परिषदेत मांडल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. शिरपूर, मालेगाव, मेडशी ते पातूर मानव विकास बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थिनींचा प्रवास सुरक्षित, नियमित आणि सुलभ होईल. त्यामुळे पालकांची चिंता कमी होईल आणि अनेक मुलींना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोठी मदत मिळेल.”

Ad 1
Tags: Pramod dongre
Previous Post

मतदार यादी विशेष पुनरीक्षण (SIR) मोहिमेसंदर्भात नेकनूर ग्रामपंचायतीत बीएलओंची आढावा बैठक

Next Post

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला पारगावात वेग; नागरिकांनी आधारकार्ड व छायाचित्रासह ग्रामपंचायतीत भेट द्यावी

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In