परंडा तालुका प्रतिनिधी:- दि.२ आज परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय प्रशालेत महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री आर के पाटील सर यांनी प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री आर के पाटील सर व सर्व शिक्षकांनी कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post