• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आवास–सासवणे–दिघोडी एसटी सेवा तीन महिन्यांपासून बंद; प्रवाशांचे हाल, बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
84
VIEWS
Ad 1
Ad 1

अलिबाग | प्रतिनिधी :

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

अलिबाग तालुक्यातील आवास, सासवणे आणि दिघोडी या गावांतील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बससेवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत असूनही अद्याप सकारात्मक निर्णय झालेला नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी या मार्गावरून अलिबाग, मुंबई, पेण आणि ठाणे या ठिकाणांसाठी दिवसातून सुमारे आठ एसटी फेऱ्या सुरू होत्या. मात्र, आवास येथे रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याचे काम सुरू असले तरी परिसरात तीन पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. असे असूनही पर्यायी मार्गाने एसटी सेवा सुरू करण्यात आलेली नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

बससेवा बंद असल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे आर्थिक भारही वाढला आहे.

या संदर्भात आवास, सासवणे आणि दिघोडी येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे अनेक वेळा लेखी निवेदने देऊन बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, या प्रश्नाकडे काही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याची नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाही उपलब्ध पर्यायी मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गावरून एसटी सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे.

Ad 1
Tags: Amol Kathe
Previous Post

वादळ-पावसाने केळी बागा जमिनदोस्त; ८०० झाडांचे नुकसान, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची मागणी

Next Post

माजी नगरसेवक सय्यद एजाज यांच्या पाठपुराव्याला यश; तय्यब नगरला एसटी बसचा अधिकृत थांबा

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

माजी नगरसेवक सय्यद एजाज यांच्या पाठपुराव्याला यश; तय्यब नगरला एसटी बसचा अधिकृत थांबा

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In