• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तहसीलदार सरिता पाटील यांच्या सामंजस्यपूर्ण पुढाकाराने शेतरस्त्याचा वाद मिटला; शेतकऱ्यांना दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

मोताळा | प्रतिनिधी :

मोताळा तालुक्यातील किन्होळा येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा वाद तहसीलदार सरिता पाटील (खटाळ) यांच्या सामंजस्यपूर्ण पुढाकारातून यशस्वीरीत्या निकाली निघाला. महसूल प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे संबंधित शेतकऱ्यांना शेताचा रस्ता उपलब्ध झाल्याने यंदाच्या हंगामातील पेरणी वेळेत करता आली.

RelatedPosts

सोने सांगवीतील अनुसूचित जाती-नवबौद्ध सभामंडप प्रकरणाची चौकशी; पंचायत समितीकडून त्रिस्तरीय समिती नियुक्त

कळंबोलीत कथित ड्रग्स अड्ड्यावर बुलडोझर; पालिका-पोलिसांची संयुक्त कारवाई

लोणखेड्यात झाड उन्मळून वाहनावर कोसळले; बालक थोडक्यात बचावले, वाहनाचे मोठे नुकसान

शेतशिवारातील रस्त्यांबाबतचे वाद न्यायालयीन प्रक्रियेत न नेता आपसातील समन्वय, प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन आणि लोकसहभागातून सोडविल्यास वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचतो, याचे हे आदर्श उदाहरण ठरले आहे.

किन्होळा येथील शेतकरी प्रकाश इंगोले आणि वसंत इंगोले यांच्यात शेतरस्त्याच्या प्रश्नावर अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार सरिता पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. दोन्ही पक्षांशी चर्चा करत सामोपचाराने तोडगा काढण्याचे महत्त्व पटवून दिले.

दोन्ही शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर गावातील पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत हा वाद अखेर सामंजस्याने सोडविण्यात महसूल प्रशासनाला यश आले.

यावेळी माजी सभापती कैलास गवई, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनोद किन्होळकर, पोलीस पाटील प्रदीप वैराळकर, मंडळ अधिकारी धनंजय शेवाळे, ग्राम महसूल अधिकारी मंदा राठोड तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

शेतरस्ता उपलब्ध झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्याला यंदाची पेरणी वेळेत करता आली असून, अनेक वर्षांचे आपसी मतभेदही दूर झाले. तहसीलदार सरिता पाटील यांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि संवेदनशील प्रशासनाचे शेतकरी व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Previous Post

विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी; पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा – युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत

Next Post

शहाद्यात ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

Related Posts

Blog

सोने सांगवीतील अनुसूचित जाती-नवबौद्ध सभामंडप प्रकरणाची चौकशी; पंचायत समितीकडून त्रिस्तरीय समिती नियुक्त

July 10, 2026
9
Blog

कळंबोलीत कथित ड्रग्स अड्ड्यावर बुलडोझर; पालिका-पोलिसांची संयुक्त कारवाई

July 10, 2026
7
Blog

लोणखेड्यात झाड उन्मळून वाहनावर कोसळले; बालक थोडक्यात बचावले, वाहनाचे मोठे नुकसान

July 10, 2026
2
Blog

शहादा महाविद्यालयाच्या तीन एनसीसी कॅडेट्सची पोलीस दलात निवड; महाविद्यालयात सत्कार

July 10, 2026
0
Blog

शहाद्यात ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

July 10, 2026
0
Blog

विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी; पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा – युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत

July 10, 2026
8
Next Post

शहाद्यात ३० जुलै रोजी जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

ताज्या बातम्या

सोने सांगवीतील अनुसूचित जाती-नवबौद्ध सभामंडप प्रकरणाची चौकशी; पंचायत समितीकडून त्रिस्तरीय समिती नियुक्त

July 10, 2026

कळंबोलीत कथित ड्रग्स अड्ड्यावर बुलडोझर; पालिका-पोलिसांची संयुक्त कारवाई

July 10, 2026

लोणखेड्यात झाड उन्मळून वाहनावर कोसळले; बालक थोडक्यात बचावले, वाहनाचे मोठे नुकसान

July 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In