• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनजागृतीला वेग; ‘मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1
Ad 1

सिंदखेडराजा | प्रतिनिधी :

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

“स्वतंत्र विदर्भ राज्य – आत्ताच, नाही तर कधीच नाही” या घोषवाक्याखाली विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ राज्य मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात व्यापक जनजागृती अभियान राबविले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा समितीने केला असून, स्वतंत्र विदर्भाच्या लढ्याला नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप यांनी सांगितले की, स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी गेल्या १२१ वर्षांपासून सुरू आहे. अनेक नेते या आंदोलनातून पुढे आले; मात्र सत्तेत गेल्यानंतर त्यांनी विदर्भाच्या प्रश्नाशी बेईमानी केल्याचा आरोप त्यांनी केला.

समितीच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी “वऱ्हाड” आणि “सोन्याची कुराड” म्हणून ओळखला जाणारा विदर्भ प्रदेश जंगलसंपदा, खनिजसंपत्ती, बारमाही नद्या आणि सुपीक जमिनीमुळे समृद्ध होता. मात्र, महाराष्ट्रात समावेश झाल्यानंतर विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याने शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, सिंचन अनुशेष, प्रदूषण आणि विकासातील विषमता यांसारख्या समस्या गंभीर बनल्या आहेत.

या अभियानाचे नेतृत्व अॅड. वामनराव चटप, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रा. निशाताई तिरपुडे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, उपाध्यक्ष अॅड. सुरेश वानखेडे, डॉ. पद्माताई राजपूत, प्रा. मेघा कोटक आणि संभाजी शिर्के यांनी केले.

५ ते १२ जुलै या कालावधीत यवतमाळ, पुसद, उमरखेड, कारंजा लाड, सिंदखेडराजा, अकोला आणि अमरावती येथे जिल्हास्तरीय बैठका व पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले.

अभियानाच्या प्रारंभी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष स्व. रंजनाताई मामर्डे तसेच शिक्षक नेते व विधान परिषद सदस्य स्व. प्रा. बी. टी. देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी २५ जुलै २०२६ रोजी सिंदखेडराजा येथे आयोजित ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ तसेच ९ ऑगस्ट रोजी नागपूर येथे दीक्षाभूमी ते संविधान चौक दरम्यान काढण्यात येणाऱ्या भव्य लॉंग मार्चच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

तसेच प्रीपेड वीज मीटर धोरणाला विरोध, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी जनआंदोलन उभारणे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी अॅड. वामनराव चटप, मुकेश मासुरकर, प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, डॉ. पद्माताई राजपूत, अॅड. सुरेश वानखेडे, बी. बी. चौधरी, वामनराव जाधव, शिवाजीराजे जाधव, डॉ. शिवाजी खरात, प्रा. दिलीप नाईकवाड, प्रवीण गीते, बालाजी सोसे, तेजराव मुंढे, प्रा. रामदास शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे आणि आत्माराम गाडे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Ad 1
Tags: Dilip Naikwad
Previous Post

चास गावातून पंढरपूरकडे पायी दिंडी प्रस्थान; टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष

Next Post

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय; ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे जुने LOI रद्द, लाभार्थ्यांना नव्याने अर्ज अनिवार्य

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
232
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
17
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय; ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे जुने LOI रद्द, लाभार्थ्यांना नव्याने अर्ज अनिवार्य

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In