• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा मोठा निर्णय; ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे जुने LOI रद्द, लाभार्थ्यांना नव्याने अर्ज अनिवार्य

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींसाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झालेल्या, मात्र संबंधित बँकेकडून कर्ज मंजुरीपत्र वेब प्रणालीवर अपलोड न झालेल्या सर्व लाभार्थ्यांचे LOI रद्द करण्यात आले आहेत.

महामंडळाने दि. २५ जून २०२६ रोजी APM/ADM/345/2026-27 क्रमांकाची अधिसूचना जारी करून हा निर्णय जाहीर केला आहे.

काय आहे निर्णय?

अधिसूचनेनुसार, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत LOI मिळालेल्या, पण बँकेची कर्ज मंजुरी प्रक्रिया पूर्ण न झालेल्या लाभार्थ्यांचे जुने LOI आता वैध राहणार नाहीत. अशा सर्व लाभार्थ्यांना महामंडळाच्या विद्यमान नियम व अटींनुसार नव्याने अर्ज करून नवीन LOI प्राप्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जुन्या LOI च्या आधारे पुढील कोणतीही कार्यवाही केली जाणार नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

लाभार्थ्यांमध्ये नाराजी

या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो प्रलंबित लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेकांनी आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया वेळेत पूर्ण केली होती. मात्र, बँकांकडून कर्ज मंजुरीला झालेल्या विलंबामुळे आता संपूर्ण अर्ज प्रक्रिया पुन्हा करावी लागणार असल्याने वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

महामंडळाचे आवाहन

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख (भा.प्र.से.) यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता नव्याने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पूर्वीच LOI प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. या निर्णयाचा परिणाम लातूरसह राज्यभरातील हजारो मराठा युवक-युवतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी जनजागृतीला वेग; ‘मिशन-२०२७’ अंतर्गत पश्चिम विदर्भात उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

सोयाबीन बियाणे न उगवल्याने पातूर तालुक्यातील शेतकरी संकटात; पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
3
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
5
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
63
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
10
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
44
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
3
Next Post

सोयाबीन बियाणे न उगवल्याने पातूर तालुक्यातील शेतकरी संकटात; पंचनामे व नुकसानभरपाईची मागणी

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In