• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परतूर पंचायत समितीत शौचालयाच्या सुविधेचा अभाव; नागरिकांकडून निवेदन, १५ दिवसांत व्यवस्था न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
71
VIEWS
Ad 1
Ad 1

परतूर | प्रतिनिधी

परतूर पंचायत समिती कार्यालयात विविध शासकीय कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. मात्र, परिसरात सार्वजनिक शौचालय व लघुशंकेची पुरेशी व्यवस्था नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र लहाणू भदर्गे, महादेव भगवान पैठणे, माजी आष्टी सर्कल उपाध्यक्ष आकाश प्रकाश साळवे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जालना जिल्हा सदस्य आकाश अंबादास वाघमारे यांच्यासह आकाश बांगर, विकास साठे, सचिन काऊतकर, अनिल मगर (पत्रकार), प्रमोद शिरसाट, रुद्र घोडे आणि अभिजित सुतार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदनात पंचायत समिती परिसरात तातडीने सार्वजनिक शौचालय व लघुशंकेची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच १५ दिवसांच्या आत आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदन स्वीकारताना नवनियुक्त गटविकास अधिकारी कौशल पाटील तसेच पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, गटविकास अधिकारी कौशल पाटील यांनी या मागणीची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल, असे त्यांनी सांगितल्याची माहिती निवेदनकर्त्यांनी दिली.

यामुळे पंचायत समितीत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

अंबरनाथमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर; प्रभाग १ब व २अ मधील नागरिक त्रस्त

Next Post

राज्यातील ७१६ आधार नोंदणी संच अचानक बंद; विद्यार्थी, शिक्षक व ऑपरेटर अडचणीत

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
8
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
12
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

राज्यातील ७१६ आधार नोंदणी संच अचानक बंद; विद्यार्थी, शिक्षक व ऑपरेटर अडचणीत

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In