• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कर्तव्यच्युतीचा ठपका; दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांच्या निलंबनाची शिफारस

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

दोडामार्ग | प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी तसेच निवडणूक आढावा बैठकीस विनापरवानगी गैरहजर राहिल्याप्रकरणी दोडामार्गचे गटविकास अधिकारी (बीडीओ) अजिंक्य सावंत यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निर्देशानंतर ही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

अतिवृष्टी पाहणीवेळी अनुपस्थित

दि. ६ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दोडामार्ग तालुक्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी मौजे वझरे येथे झाडे पडून सुमारे ३० घरांचे नुकसान झालेल्या परिसराची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र, या महत्त्वपूर्ण दौऱ्यावेळी गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

आपत्ती व्यवस्थापनात निष्काळजीपणाचा आरोप

यापूर्वी २० एप्रिल २०२६ रोजी पावसाळ्यापूर्वीच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पूर्वतयारीसंदर्भात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत धोकादायक झाडे तोडण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना सूचना देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. मात्र, या निर्देशांची योग्य अंमलबजावणी न झाल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

निवडणूक आढावा बैठकीलाही गैरहजेरी

याच दिवशी तहसीलदार कार्यालयात आयोजित विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) निवडणूक आढावा बैठकीलाही अजिंक्य सावंत गैरहजर राहिल्याचे समोर आले. या गैरहजेरीसाठी त्यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विषयात कथित निष्काळजीपणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकींना विनापरवानगी गैरहजर राहिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने त्यांच्या निलंबनाची शिफारस केली असून पुढील निर्णय शासनस्तरावर अपेक्षित आहे.

Ad 1
Previous Post

३१ वर्षांच्या ज्ञानसेवेनंतर शिक्षक व्यंकटराव सूर्यवंशी यांचा भावपूर्ण सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न

Next Post

‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषात वझरेहून पंढरपूरकडे वारकऱ्यांचे प्रस्थान; विशाल परब व वेदिकाताई परब यांची उपस्थिती

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
10
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
13
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
11
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
4
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
37
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
11
Next Post

'राम कृष्ण हरी'च्या जयघोषात वझरेहून पंढरपूरकडे वारकऱ्यांचे प्रस्थान; विशाल परब व वेदिकाताई परब यांची उपस्थिती

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In