• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

३१ वर्षांच्या ज्ञानसेवेनंतर शिक्षक व्यंकटराव सूर्यवंशी यांचा भावपूर्ण सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

हालकी | प्रतिनिधी

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे जि.प. प्राथमिक शाळा, हालकी येथील ज्येष्ठ शिक्षक व्यंकटराव रामराव सूर्यवंशी (पाटील) यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा नुकताच उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.

सुमारे ३१ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर श्री. सूर्यवंशी हे ३० जून २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियंका सुधाकर शिंदे या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. सूर्यवंशी यांच्या अध्यापनातील समर्पण, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि शैक्षणिक कार्याचा गौरव केला.

यावेळी पंचायत समितीचे सभापती संजय हरिश्चंद्र सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव गायकवाड, पंचायत समिती सदस्य हमीद पटेल, गटविकास अधिकारी शितल शिंदे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पागे, गट शिक्षण अधिकारी विशाल मुळे, केंद्रप्रमुख प्रदीप कमठाणे, हालकीच्या सरपंच कांताबाई ज्ञानोबा सूर्यवंशी, तळेगाव बोरीचे सरपंच अक्षय पाटील तसेच तुकाराम लांडगे, खंडेराव चव्हाण, कमलाकर सूर्यवंशी, वेदप्रकाश भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना श्री. व्यंकटराव सूर्यवंशी भावूक झाले. त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. “शाळा ही केवळ इमारत नसून ती संस्कारांची पवित्र जागा आहे,” असे सांगत त्यांनी सहकारी शिक्षक आणि ग्रामस्थांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शनानंतर उपस्थितांनी श्री. सूर्यवंशी यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Ad 1
Previous Post

कन्हेरी नाल्यात मैला सोडल्याचा आरोप; ग्रामस्थांकडून चौकशी व कारवाईची मागणी

Next Post

कर्तव्यच्युतीचा ठपका; दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांच्या निलंबनाची शिफारस

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
10
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
13
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
11
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
4
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
37
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
11
Next Post

कर्तव्यच्युतीचा ठपका; दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांच्या निलंबनाची शिफारस

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In