• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिल्लोडच्या पूर्णा नदीत सांडपाणी; प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजनांची खासदार डॉ. कल्याणराव काळे यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

सिल्लोड | प्रतिनिधी

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

सिल्लोड शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट पूर्णा नदीच्या पात्रात सोडले जात असल्याचा आरोप होत असून, त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर जालना लोकसभेचे खासदार डॉ. कल्याणराव काळे यांनी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.

बैठकीत खासदारांनी शहरात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP) प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने पूर्णा नदीचे पाणी प्रदूषित होत असून, भवन, बोरगाव, चिंचखेडा आणि तांडा बाजार परिसरातील नागरिकांना दुर्गंधी व आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

“नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ देता येणार नाही. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी खासदार डॉ. काळे यांनी केली. तसेच, योग्य कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

बैठकीदरम्यान उपविभागीय अधिकारी फुलारी, तहसीलदार अंकिता ताकभाते आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीला काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर घायवट पाटील, तालुकाध्यक्ष निलेश काळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश कळम, ॲड. लिंगायत, माजी शहराध्यक्ष शेख फिरोज, शहराध्यक्ष आवेश आझाद दांडगे, फिरोज मेवाती यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, नागरिकांनी शहरातील सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया करूनच ते नदीत सोडावे, अशी मागणी केली असून, प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची घोषणा; १३ लाख शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत दिलासा, आमदार रणधीर सावरकरांनी मानले आभार

Next Post

वारकरी धर्म परिषदेच्या पाठपुराव्याला यश; आषाढी वारीसाठी टोलमाफीचा कालावधी २३ दिवसांपर्यंत वाढला

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
वारकरी धर्म परिषदेच्या पाठपुराव्याला यश; आषाढी वारीसाठी टोलमाफीचा कालावधी २३ दिवसांपर्यंत वाढला

वारकरी धर्म परिषदेच्या पाठपुराव्याला यश; आषाढी वारीसाठी टोलमाफीचा कालावधी २३ दिवसांपर्यंत वाढला

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In