• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देशसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या BSF जवान राजेंद्र पाटील यांना अखेरचा निरोप; वलवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1
Ad 1

भडगाव | वार्ताहर

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

भडगाव तालुक्यातील वलवाडी गावचे सुपुत्र तथा सीमा सुरक्षा दल (BSF) मधील जवान राजेंद्र रामचंद्र पाटील यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. देशसेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या जवानाच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. १० जुलै) वलवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी उपस्थित राहून अश्रुपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला.

राजेंद्र पाटील यांनी सन २०१२ मध्ये सीमा सुरक्षा दलात प्रवेश करून देशसेवेची वाट निवडली होती. कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी सहकाऱ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. सध्या त्यांची नियुक्ती छत्तीसगडमधील रायपूर येथे होती.

कर्तव्य बजावत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. प्रथम त्यांना मूळ गावी आणून उपचार करण्यात आले. त्यानंतर धुळे येथील रुग्णालयात आणि पुढे सुरत येथील विशेष रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक भाऊ, एक बहीण आणि अडीच वर्षांचा मुलगा तनुष पाटील असा परिवार आहे. अंत्यसंस्कारावेळी चिमुकल्या तनुषने वडिलांना अग्निडाग दिला. हा क्षण उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला.

अंत्ययात्रेदरम्यान संपूर्ण वलवाडी गावात शोकमय वातावरण होते. गावातील चौकाचौकात श्रद्धांजलीपर डिजिटल फलक लावण्यात आले होते. “भारत माता की जय”, “राजेंद्र पाटील अमर रहें” आणि “जय जवान”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

अंत्यसंस्कारावेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शोकसलामी अर्पण केली. तसेच भडगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार रमेश देवकर, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश टाक, पोलीस अधिकारी व कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

राजेंद्र पाटील यांच्या निधनाने भडगाव तालुक्याने एक कर्तव्यनिष्ठ, देशभक्त आणि शूर जवान गमावला आहे. त्यांच्या शौर्याची, सेवाभावाची आणि देशनिष्ठेची प्रेरणा कायम स्मरणात राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Ad 1
Previous Post

कजगावात अनोखा उपक्रम; अस्थी विसर्जनाऐवजी वृक्षारोपण करून जपली स्मृती

Next Post

सासवणे ग्रामपंचायतीकडून अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
6
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
सासवणे ग्रामपंचायतीकडून अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

सासवणे ग्रामपंचायतीकडून अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष; खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In