राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये टाकून देत जनतेच्या मनात घर करण्याचा प्रयत्न केला.
मात्र हिंदू संस्कृती प्रमाणे येणारे सर्वात महत्त्वाचे सण म्हणजे दसरा व दिवाळी या सणांच्या शुभमुहूर्तावरच खाद्यतेलाचे दर हे गगनाला भिडले आहेत.अगोदरच शंभरी पार झालेल्या खाद्यतेलाची प्रति किलोमागे २५ रुपयांची वाढ होऊन १३६ ते १४० रुपये प्रति किलो दर झालेला असल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावरच गृहिणीच्या बजेटचे नियोजन तर कोलमडलेले आहेत.
पण त्याचबरोबर सर्वसामान्यनागरिकांच्या खिशाला सुद्धा कात्री लागलेली आहे. या सर्व प्रकार पाहता लाडकी बहीण नावाने चालू झालेल्या योजनेचे अनुदान जरी नागरिकांना व महिलांना सरकारच्या बाजूने जनतेचा वाढता पाठिंबा ठरणार हे निश्चित झाले असतानाच अचानकपणे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या असल्याने या एकीकडे ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळे अगोदरच आर्थिक स्थिती खालावली असून त्यात या महागाईने डोके वर की काय असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
Discussion about this post