• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूर नगरपरिषद शाळा क्र. १ व २ ला ‘सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले’ यांचे नाव द्यावे; लहुजी शक्ती सेनेची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे | प्रतिनिधी

शिरूर शहरातील लाटे आळी येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ या ऐतिहासिक शाळेला ‘सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल उर्फ बंटी जोगदंड यांनी शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

निवेदनात म्हटले आहे की, सत्यशोधक चळवळीचे प्रणेते, थोर समाजसुधारक आणि आधुनिक शिक्षणाचे जनक म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य देशासाठी प्रेरणादायी आहे. समाजातील वंचित, बहुजन, शोषित तसेच महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.

१ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून महात्मा फुले यांनी भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात बहुजन समाज आणि महिलांच्या शिक्षणासाठी एकूण १८ शाळांची स्थापना केली.

निवेदनानुसार, या शाळांपैकी शाळा क्रमांक १० ही १८ सप्टेंबर १८४९ रोजी शिरूर येथे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली होती. सध्या त्याच ठिकाणी नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ कार्यरत असल्याने या ऐतिहासिक शाळेला ‘सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले’ यांचे नाव देऊन त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महात्मा फुले यांनी शिक्षणाचा अधिकार सर्व समाजघटकांसाठी खुला करत सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा पाया रचला. त्यामुळे या ऐतिहासिक शाळेचे नामकरण त्यांच्या नावाने करण्याचा निर्णय नगरपरिषदेकडून तातडीने घेण्यात यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाची प्रत नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे तसेच नगरसेविका व पाणीपुरवठा विभागाच्या सभापती डॉ. सुनिता पोटे यांना देण्यात आली. निवेदन देताना पुणे उपशहराध्यक्ष विनोद उर्फ पप्पू साठे, सामाजिक कार्यकर्ते रियाजभाई सय्यद, तुषारभाऊ भवाळ आणि शहराध्यक्ष सुमित बागवे उपस्थित होते.

Ad 1
Tags: Avinash Ghogare
Previous Post

माढा नगरपंचायतीसमोर १६ जुलैपासून ‘हलगी नाद’ आंदोलनाचा इशारा; हातपंप व बोरवेल बुजवल्याचा आरोप

Next Post

नाशिकमध्ये एसीबीचा सापळा; पोलीस अंमलदार ₹90 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
369
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
24
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
18
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
38
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
37
Next Post

नाशिकमध्ये एसीबीचा सापळा; पोलीस अंमलदार ₹90 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In