• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

पातूर | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी आणि शासनव्यवस्थेची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक संपूर्ण लोकशाही पद्धतीने उत्साहात पार पडली.

या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी, अर्ज मागे घेणे, प्रचारासाठी स्वतंत्र वेळ तसेच मतदान प्रक्रिया अशा सर्व टप्प्यांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देश, राज्य, जिल्हा आणि गावपातळीवरील लोकशाही व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.

शाळेच्या प्रशासनात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक तसेच महिला व बालकल्याण अशा विविध खात्यांची निर्मिती करण्यात आली आहे. निवडून आलेले विद्यार्थी संबंधित खात्यांचे मंत्री म्हणून वर्षभर कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या समस्या, सूचना आणि गरजा शाळा व्यवस्थापनापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहेत.

यावर्षी प्रथमच महिला व बालकल्याण खाते स्थापन करण्यात आले असून त्यासाठी स्वतंत्र मंत्रिपदाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न आणि आवश्यक बाबी प्रभावीपणे हाताळण्यास मदत होणार आहे.

या निवडणुकीत विजयी झालेले विद्यार्थी विविध खात्यांचे मंत्री म्हणून कार्यरत राहतील. त्यांच्यामधूनच लोकशाही पद्धतीने शालेय मुख्यमंत्र्याची निवड करण्यात येणार आहे.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समितीच्या सूचनेनुसार प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन ढोणे व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक जे. डी. कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Ad 1
Previous Post

वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

Next Post

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पालम तालुकाध्यक्षपदी गुणवंत सराफ; उपाध्यक्षपदी चांद तांबोळी यांची निवड

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
302
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
22
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
17
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
31
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
36
Next Post
‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पालम तालुकाध्यक्षपदी गुणवंत सराफ; उपाध्यक्षपदी चांद तांबोळी यांची निवड

'व्हॉइस ऑफ मीडिया'च्या पालम तालुकाध्यक्षपदी गुणवंत सराफ; उपाध्यक्षपदी चांद तांबोळी यांची निवड

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In