• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; तेल्हारा तालुक्यात पिकांवर ताण वाढला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा; तेल्हारा तालुक्यात पिकांवर ताण वाढला
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

तेल्हारा | प्रतिनिधी

RelatedPosts

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

नेकनूरच्या अप्पर तहसील कार्यालयासाठी शिवसेनेचा पाठपुरावा; महसूल मंत्र्यांचे तातडीने कारवाईचे आदेश

तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ बु. परिसरात जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात खरीप पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, ९ जुलैनंतर पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

परिसरात जवळपास शंभर टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. मात्र, कडक ऊन आणि वाढत्या उष्णतेमुळे पावसाअभावी पिकांवर ताण निर्माण होत असून शेतकरी आता चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत.

शेतकऱ्यांच्या मते, पुढील चार ते पाच दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकटही निर्माण होऊ शकते.

दरम्यान, पावसाअभावी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होऊ लागला आहे. त्यामुळे शेतीबरोबरच पशुपालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या पिवंदळ बु. परिसरातील बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागले असून लवकरात लवकर दमदार पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Previous Post

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम; शिवनेरी हौसिंग सोसायटीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next Post

केळवारोड पूरस्थितीची प्रांत अधिकाऱ्यांकडून पाहणी; पूर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Related Posts

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात
Blog

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

July 12, 2026
0
वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग
Blog

वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

July 12, 2026
0
Blog

नेकनूरच्या अप्पर तहसील कार्यालयासाठी शिवसेनेचा पाठपुरावा; महसूल मंत्र्यांचे तातडीने कारवाईचे आदेश

July 12, 2026
2
कल्याणनगर हायवेवरील सितेवाडीजवळ भीषण अपघात; वाहन पलटी, जीवितहानी टळली

जव्हारच्या दुर्गम भागात ६०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; वृक्षारोपणातून पर्यावरणाचा संदेश

1
केळवारोड पूरस्थितीची प्रांत अधिकाऱ्यांकडून पाहणी; पूर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Blog

केळवारोड पूरस्थितीची प्रांत अधिकाऱ्यांकडून पाहणी; पूर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

July 12, 2026
13

ताज्या बातम्या

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

शाळेत रंगली लोकशाहीची शाळा! सावित्रीबाई फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात

July 12, 2026
वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

वन महोत्सवानिमित्त हरित संदेश; वृक्षारोपणासह क्रिकेट स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

July 12, 2026

नेकनूरच्या अप्पर तहसील कार्यालयासाठी शिवसेनेचा पाठपुरावा; महसूल मंत्र्यांचे तातडीने कारवाईचे आदेश

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In