• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भिलवडी शिक्षण संस्थेत प्रा. डॉ. एच. सी. वर्मा यांचे कृतीयुक्त मार्गदर्शन; प्रयोगांद्वारे विज्ञान शिकविण्यावर भर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
53
VIEWS
Ad 1
Ad 1

भिलवडी | प्रतिनिधी

भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ तथा आयआयटी कानपूरचे प्रा. डॉ. एच. सी. वर्मा यांच्या कृतीयुक्त मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन SSB-IAPT, भिलवडी यांच्या सहकार्याने करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

सकाळच्या सत्रात प्रा. वर्मा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान विषय सोप्या आणि आनंददायी पद्धतीने कसा शिकवता येतो, याचे प्रात्यक्षिक सादर केले. या सत्राला माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी, इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी तसेच परिसरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुसऱ्या सत्रात शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि मान्यवरांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सरस्वती पूजन आणि विद्युत ज्ञानज्योती प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

दीड तासांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. वर्मा यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्यापनाद्वारे सक्षम बनवावे, असे आवाहन केले. “डॉक्टर आणि अभियंत्यांपेक्षा समाजाला चांगल्या शिक्षकांची अधिक गरज आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हाने स्वीकारण्याची सवय लावावी, अभ्यासातील शॉर्टकट टाळावेत आणि संकल्पनात्मक शिक्षणावर भर द्यावा, असा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक मुकुंद जोग होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. वर्मा यांच्या विचारांमधून मिळालेल्या प्रेरणेच्या बळावर शैक्षणिक वाटचाल अधिक प्रभावी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. मोरे यांनी प्रा. वर्मा यांची भेट ही संस्थेसाठी भाग्याची बाब असल्याचे सांगून या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करणारे प्रा. डॉ. जी. बी. पाटील यांचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव के. डी. पाटील आणि प्रा. जी. बी. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापिका सौ. शिंदे यांनी करून दिला. सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एम. एस. पुजारी यांनी केले.

या कार्यक्रमाला संस्थेच्या सर्व विभागांतील शिक्षक, परिसरातील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात लोणी काळभोर नगरीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत

Next Post

४,३०० लेखण्यांतून उमटला नशामुक्तीचा संदेश; जालना पोलिसांच्या निबंध स्पर्धेत ५३ शाळांचा सहभाग

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
245
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
19
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post

४,३०० लेखण्यांतून उमटला नशामुक्तीचा संदेश; जालना पोलिसांच्या निबंध स्पर्धेत ५३ शाळांचा सहभाग

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In