• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणीच्या श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
लोणीच्या श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

लोणी | प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील सहसचिव व्यंकटेश भट, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे सहसचिव मंगेश शिंदे, गृह विभागाचे अवर सचिव बोरसे तसेच महिला अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेच्या परिसरात राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.

भेटीदरम्यान शाळेचे मुख्याध्यापक थोरात सर व शिक्षकवृंद यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास शाळेचे माजी विद्यार्थी, विकास प्रबोधिनीचे मार्गदर्शक व महसूल विभागातील सहसचिव कैलास गायकवाड, उपसरपंच राजूशेठ वाळुंज, पिंटूशेठ पडवळ, प्रकाशजी वाळुंज, साकोरे सर, शिवाजी नाना सिनलकर, बबनदादा वाळुंज, पोलीस अकादमीचे पडवळ सर, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सहसचिव व्यंकटेश भट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “जीवनात अनेक आव्हाने आणि अडचणी येतात. मात्र त्यांना धैर्याने सामोरे जात सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते. अपयश ही यशाची पहिली पायरी असून मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मान्यवरांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाविषयीची जाणीव जोपासण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक थोरात सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना मिळालेले हे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांच्या शैक्षणिक तसेच वैयक्तिक विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Ad 1
Previous Post

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

Next Post

एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू

एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In