• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

गडचिरोली | प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नक्षलवादी आशयाचे बॅनर आणि पत्रके आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम तीव्र केली आहे. या पत्रकांमध्ये खाण प्रकल्पांशी संबंधित काही कंपन्यांचा उल्लेख करून त्यांचे काम बंद करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंडम गावाजवळ रविवारी दोन ठिकाणी नक्षलवादी आशयाचे बॅनर व पत्रके आढळून आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅनर व पत्रके जप्त केली. या घटनेनंतर छत्तीसगड सीमेलगतच्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिकदृष्ट्या विकसित करण्याच्या धोरणाअंतर्गत विविध खाण प्रकल्पांना गती दिली आहे. एटापल्ली परिसरातही लोहखनिज साठ्यांचे सर्वेक्षण सुरू असताना समोर आलेल्या पत्रकांमध्ये काही कंपन्यांचा उल्लेख करून त्यांचे काम थांबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हेटळकसा, कुदरी आणि मोहरली परिसरात सुरू असलेल्या ड्रोन सर्वेक्षणालाही विरोध दर्शविण्यात आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

पत्रकांमध्ये जल, जंगल आणि जमीन यासंदर्भातील मुद्दे उपस्थित करण्यात आले असून स्थानिक नागरिकांना आंदोलनासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. तसेच संबंधित कंपन्यांना सहकार्य करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांबाबतही धमकीवजा मजकूर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून बॅनर व पत्रके नेमकी कोणी लावली, त्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सांगितले की, “पिपली बुर्गी परिसरात आढळलेल्या बॅनर आणि पत्रकांची चौकशी सुरू आहे. ती प्रत्यक्षात नक्षलवाद्यांनीच लावली आहेत का, याची खातरजमा करण्यात येत आहे.”

Ad 1
Tags: Rajesh Magaunwar
Previous Post

लोणीच्या श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next Post

आलापल्लीत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; गांजा व चिलमसह एक जण अटकेत

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
आलापल्लीत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; गांजा व चिलमसह एक जण अटकेत

आलापल्लीत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; गांजा व चिलमसह एक जण अटकेत

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In