
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्न व समस्या मांडल्या.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांनी निवृत्तीवेतन, प्रशासकीय अडचणी तसेच इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात आमदारांचे लक्ष वेधले. सर्व समस्या शांतपणे ऐकून घेत आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी त्या शासन स्तरावर मांडून त्यांचा सातत्याने पाठपुरावा करून लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
बैठकीला जिल्हा व तालुका स्तरावरील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
बैठकीच्या शेवटी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे आभार मानण्यात आले.


