• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणी येथे महिला शेतकऱ्यांनी घेतले नैसर्गिक शेतीचे धडे; जीवामृत, दशपर्णी अर्क प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

पाथरी | प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी तालुक्यातील लोणी येथे नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महिला शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व, विषमुक्त अन्न उत्पादन, जैविक निविष्ठांचा वापर आणि शाश्वत शेतीच्या तंत्रांची सविस्तर माहिती देण्यात आली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कार्यक्रमात जागृती महिला शेतकरी गटाच्या वतीने जीवामृत आणि दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रात्यक्षिकाला महिला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल दलाल यांनी रासायनिक शेती आणि नैसर्गिक शेतीतील फरक स्पष्ट करत वाढता उत्पादन खर्च, जमिनीची घटती सुपीकता आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. विषमुक्त अन्न उत्पादनातून ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासोबतच शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरणही शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

सहाय्यक कृषी अधिकारी सुखदेव गिरी यांनी दहा ड्रम थेअरी, जीवामृत, दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क, चिकट सापळे, कामगंध सापळे आणि पक्षी थांबे यांच्या माध्यमातून नैसर्गिक व एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती दिली. यावेळी जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. नैसर्गिक निविष्ठांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते आणि उत्पादन खर्चात बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब

दलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, पाणी बचत आणि नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पाअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर वाढविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

जागृती महिला शेतकरी गटाच्या कृषीसखी सरस्वतीताई मांयदळे आणि मंगलताई फुके यांनी स्वतःच्या अनुभवातून नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत, जमिनीची सुपीकता वाढ आणि पिकांच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे सांगितले.

या शेती शाळेमुळे महिला शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर मिळाल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृषी विभागाच्या या उपक्रमातून विषमुक्त, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीचा प्रभावी संदेश देण्यात आला.

Ad 1
Tags: Ahamad Ansari
Previous Post

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

Next Post

मोहीदे येथील शासकीय निवासी शाळेतील अन्न विषबाधा प्रकरण गंभीर; १० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

मोहीदे येथील शासकीय निवासी शाळेतील अन्न विषबाधा प्रकरण गंभीर; १० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In