• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ठाकर आडगाव येथील बालवाडीची दुरवस्था; चिमुरड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
ठाकर आडगाव येथील बालवाडीची दुरवस्था; चिमुरड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

ठाकर आडगाव | प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील बालवाडीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, इमारतीच्या जीर्ण अवस्थेमुळे चिमुरड्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बालवाडीच्या दुरुस्तीकडे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून करण्यात येत आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, बालवाडीच्या चहूबाजूंच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असून छताचे प्लास्टरही निखळून खाली पडत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच इमारतीत घुशी व उंदरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

याशिवाय, लहान मुलांच्या खाऊसाठी सुरक्षित साठवण व्यवस्था नसल्याची तसेच मुलांना बसण्यासाठीही पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, या समस्येबाबत स्थानिक सरपंचांकडे सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवीन अंगणवाडीसाठी जागा निश्चित होऊनही सहा महिने उलटले तरी बांधकामाला सुरुवात झालेली नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

“जर एखाद्या लहान मुलाच्या अंगावर छताचे प्लास्टर किंवा भिंत कोसळली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. तसेच बालवाडीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन इमारतीची दुरुस्ती अथवा नवीन इमारतीचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Ad 1
Previous Post

एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त दोंडाईचा बस आगारात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next Post

आदर्श माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक मेळावा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
आदर्श माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक मेळावा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आदर्श माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक मेळावा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In