• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त दोंडाईचा बस आगारात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

दोंडाईचा | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त दोंडाईचा बस आगारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. उद्योगपती सरकार साहेब रावल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन, आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सरकार साहेब रावल यांनी प्रत्येक नागरिकाने भविष्यातील पर्यावरणीय संकट लक्षात घेऊन किमान पाच वृक्षांची लागवड करण्याचे आवाहन केले. दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण हाच प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवीण महाजन यांनी सांगितले की, माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो वृक्षांची लागवड केली जाते. तसेच सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त मालपूर रोडवरील वनविभागाच्या जागेत भव्य ऑक्सिजन पार्क उभारण्यात येत असून, नागरिकांनी तेथे जाऊन वृक्षारोपणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

याशिवाय, प्रवाशांच्या सोयीसाठी दोंडाईचा आगारात लवकरच नवीन जिजाऊ आणि वातानुकूलित शिवाई बसेसचा समावेश करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांनी दोंडाईचा बस आगार परिसरात दरवर्षी सातत्याने वृक्षारोपण करून दाट हरित पट्टा विकसित करण्यात आल्याचे सांगितले. यंदाही उपलब्ध जागेत जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक निरीक्षक सुनील भाबड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आगारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Ad 1
Tags: Pandhurang Shimpi
Previous Post

भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू

Next Post

ठाकर आडगाव येथील बालवाडीची दुरवस्था; चिमुरड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
ठाकर आडगाव येथील बालवाडीची दुरवस्था; चिमुरड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

ठाकर आडगाव येथील बालवाडीची दुरवस्था; चिमुरड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In