• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

२९ जुलैपूर्वी एसआयआर मॅपिंग करा; मतदानाचा हक्क वाचवा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1
Ad 1

मतदार यादीतून नाव वगळले जाण्याची शक्यता; तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांचे नागरिकांना आवाहन

करमाळा | प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मॅपिंग अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयात तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रतिनिधी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

बैठकीत बोलताना तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी सांगितले की, मतदार यादीतील प्रत्येक पात्र मतदाराची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी एसआयआर मॅपिंग प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याने प्रत्येक नागरिकाने २९ जुलैपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी, असे त्यांनी आवाहन केले.

त्या म्हणाल्या की, आपल्या भागातील बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि प्रशासनाला सहकार्य करावे. मतदानाचा मूलभूत अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

तहसीलदार ठोकडे यांनी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाही गावागावांत जनजागृती करण्याचे आवाहन केले. एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी पक्षांच्या संघटनात्मक यंत्रणेने सक्रिय भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले. बीएलओ-२ यांच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात येणार असून, या कामात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बैठकीत मतदार यादीतील नावांची पडताळणी, नवीन मतदारांची नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीला मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, भाजप ग्रामीण तालुकाध्यक्ष तथा मकाईचे संचालक सचिन बापू पिसाळ, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी दीदी बागल यांचे स्वीय सहाय्यक शेखर जोगळेकर, मकाईचे संचालक सतीश बापू नीळ, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, अशोक नरसाळे, अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके, पत्रकार सुनील भोसले, प्रफुल्ल दामोदरे, रितेश कटारिया, संजय चौगुले, प्रशांत भोसले, सिद्धार्थ वाघमारे, दिनेश मुथ्था, सचिन चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी पुन्हा एकदा आवाहन करताना सांगितले, “लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने २९ जुलैपूर्वी एसआयआर मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा.”

Ad 1
Previous Post

लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामुळे घोणसपूर रस्त्याच्या दुरुस्तीला वेग

Next Post

उजनीतून तातडीने पाणी सोडा; शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीज द्या

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
12
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
9
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
40
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

उजनीतून तातडीने पाणी सोडा; शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीज द्या

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In